'आंधळी कोशिंबीर' मध्ये काम करताना धमाल... - प्रिया बापट
काकस्पर्शसारख्या गंभीर चित्रपटातून ताकदीचा अभिनय साकारून रसिकांची वाहवा मिळवणारी युवा अभिनेत्री प्रिया बापट 'आंधळी कोशिंबीर' या चित्रपटातून आपल्या हलक्याफुलक्या नर्मविनोदी अभिनायाचे गुण दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपामध्ये ती मॉडर्न लूक साकारत आहे. या चित्रपटाबाबत प्रिया फार उत्साही आहे. ती म्हणाली, 'आंधळी कोशिंबीर' च्या सेटवर काम करताना छान मजा आली. अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, मृण्मयी देशपांडे या तरुण कलाकारांसोबत माझं मस्त ट्युनिंग जमलं आहे. आम्ही सेटवर नुसती धमाल करत असतो. या चित्रपटाच्या निमित्ताने तीन पिढ्यांतील कलाकार एकत्र आले आहेत. त्यामुळं प्रत्येक पिढीतील रसिकांना 'आंधळी कोशिंबीर' हा चित्रपट निश्चितच आवडेल.

Sudha Productions
0 comments: