आंधळी कोशिंबीर' मॅड कॉमेडी - अभिनेता अनिकेत विश्वासराव
मराठी चित्रपटसृष्टीतला तरुण अन् डॅशिंग अभिनेता म्हणून अनिकेत विश्वासराव ओळखला जातो. आपल्या या इमेजला आता विनोदी तडका देऊन अनिकेत आता 'आंधळी कोशिंबीर' या चित्रपटातून आपल्याला खळखळून हसवायला येणार आहे. या चित्रपटाच्या टीमबाबत बोलताना अनिकेत म्हणाला, 'आंधळी कोशिंबीर' च्या निमित्ताने खुप चांगली टीम एकत्र आली आहे. अशोक सराफ, वंदना गुप्ते, आनंद इंगळे, ऋषीकेश जोशी, प्रिया बापट यांसारख्या तीन पिढ्यातील कलाकारांसोबत काम करताना खुप मजा आली. हा चित्रपट म्हणजे एक मॅड कॉमेडी आहे. त्यामुळे चित्रपट पाहताना रसिक प्रेक्षक फुल्ल धमाल एन्जॉय करतील.

Sudha Productions
0 comments: