Sudha Productions - Official Blog

Tuesday, 6 August 2013

'आंधळी कोशिंबीर' रंगणार - वंदना गुप्ते

Posted by Unknown  |  at  Tuesday, August 06, 2013 No comments

----------'आंधळी कोशिंबीर' रंगणार - वंदना गुप्ते----------
लपंडाव या चित्रपटानंतर तब्बल २० वर्षांनी अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची जोडी 'आंधळी कोशिंबीर' मधून पडद्यावर येत आहे. दोन्ही चित्रपटांची नावे खेळाशी संबंधित आहेत. या दोन्ही चित्रपटातून नात्यांमधल्या गुंतागुंतीची हलकीफुलकी खेळी मांडण्यात आली आहे. 'आंधळी कोशिंबीर' या चित्रपटातील आपल्या भूमिकेबाबत बोलताना वंदना गुप्ते म्हणाल्या, खुप वर्षांनी मी विनोदी भूमिका साकारत आहे. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा एक अर्कचित्र आहे. उत्तम भाषिक विनोद, चपखल संवाद, अन् सगळ्या विनोदी कलाकारांची जमलेली भट्टी या गोष्टी चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. प्रत्येक कलाकार समरसून आपल्या भूमिकेला योग्य न्याय देत आहे. त्यामुळे पडद्यावर ही 'आंधळी कोशिंबीर' चांगली रंगणार आहे. पडद्यावर रंगणारा हा खेळ पाहून रसिक प्रेक्षक खुश होणार आहेत.

Photo: ----------'आंधळी कोशिंबीर' रंगणार - वंदना गुप्ते----------

Sudha Productions

is the Marathi Film production company headed by Anuya Mhaiskar and Sachin Awasthee.

Get Updates

Subscribe to our e-mail newsletter to receive updates.

Share This Post

Related posts

0 comments:

back to top