इंगळे बंधूंची 'आंधळी कोशिंबीर'
अभिनेता आनंद इंगळे आणि दिग्दर्शक आदित्य इंगळे हे दोघेही सध्या मराठी चित्रपटसृष्टी जग गाजवत आहेत. एक भाऊ समर्थ, ताकदवान अभिनेता तर दुसरा भाऊ प्रतिभावंत, संवेदनशील दिग्दर्शक. या दोघांच्या जोडगोळीने पाऊलवाट हा नातेसंबंधांचा वेध घेणारा चित्रपट सादर करून आपल्या सृजनशीलतेची ओळख रसिकांना करून दिली होती. आता याच नातेसंबंधांवर हलक्याफुलक्यचा पद्धतीने भाष्य करण्यासाठी दोघेही सज्ज झाले आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित 'आंधळी कोशिंबीर' या चित्रपटामध्ये आनंद इंगळे पुन्हा एकदा आपल्या विनोदी भूमिकेतून रसिकांपुढे येणार आहेत. तेव्हा या दोघांच्या कला-कौशल्यांची 'आंधळी कोशिंबीर' पहायला विसरू नका बरं का!

Sudha Productions
0 comments: